नांदेड तालुक्यातील मौजे. बोंढार (नेरली) येथे पवित्र आसना नदीकाठी निसर्गरम्य पुरातन वसलेले महारुद्र हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात सात दिवस सप्ताह असतो त्यादिवाशी खूप श्रद्धेने भावीक भक्त सात दिवस मुक्कामी राहतात तसेच सात दिवस सर्व गावातील नागरिक भावीक भक्त यांना गावातील जेवण्याची व राहण्याची सोय करतात. तसेच या ठिकाणी आरोग्याविषयी शिबिर आयोजिले जाते गावातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सामुहिक विवाह मेळावा कार्यक्रम तसेच भजन कीर्तन तसेच अन्नदान मोठ्या प्रमाणात होते येथे जवळपासचे खेडेपड्याचे भाविक खूप श्रद्धेने महारुद्र दर्शनासाठी येतात.


